महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनसुराज्याच्या नारळाच्या बागेचे बळ मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

01:33 PM Oct 30, 2024 IST | Radhika Patil
The strength of Janasurajya's coconut grove raised many eyebrows.
Advertisement

मानसिंग खोराटेंना जनसुराज्याचे बळ !

Advertisement

चंदगड : चंदगड विधानसभा मतदार संघातून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलेले , अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खराटे यांना ऐनवेळी आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्याची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनसुराज्यच्या उमेदवारांची संख्या आता चार झाली आहे. एकीकडे विद्यमान आमदार राजेश पाटील हे महायुतीचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात मूळ भाजपचे शिवाजीराव पाटील हेही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.

Advertisement

कोरे यांनी मानसिंग खोराटे यांना जनसूराज्याच्या नारळाच्या बागेचे बळ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे मात्र नक्की . चंदगड मधून या अगोदर ज्यांनी ज्यांनी जन सुराज्याच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली ते विजयी झालेत. जनसुराज्यची उमेदवारी घेऊन नरसिंगराव पाटील या अगोदर चंदगड मधून आमदार झाले त्या नंतर गोपाळराव पाटील, अशोक सराठी यांनीही जनसूराज्य तिकिटावर निवडणूक लढवली होती. आता खोराटे यांना शेवटच्या क्षणी जनसूराज्याची उमेदवारी मिळाल्याने , यावेळी विजयाची पुनरावृत्ती खोराटे करणार का ? अशी चर्चा चंदगड मतदार संघामध्ये रंगू लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article