For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शिक्षण क्षेत्रासाठी भरीव योगदान देणाऱ्या मानसी कावले यांचे निधन

04:39 PM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिक्षण क्षेत्रासाठी भरीव योगदान देणाऱ्या मानसी कावले यांचे निधन
Advertisement

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील श्री नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रमुख देणगीदार आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मानसी नामदेव कावले यांचे रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई येथे निधन झाले.

Advertisement

पती नामदेव शंकर कावले यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या भावनेतून त्यांनी आचरा परिसरातील शिक्षण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेली इंग्लिश मीडियम स्कूलची वास्तू त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची कायमस्वरूपी आठवण म्हणून उभी आहे.

मानसी कावले यांच्या निधनाने आचरा पीपल्स असोसिएशन, शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच आचरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.

Advertisement

आचरा पीपल्स असोसिएशनच्या वतीने कार्याध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाच्या दुःखापोटी संस्थेच्या तिन्ही शाखा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisement
Tags :

.