कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवणात जितेंद्र आव्हाडांचा पुतळा मनसैनिकांनी जाळला

02:45 PM Jan 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण | वार्ताहर

Advertisement

श्री प्रभू रामचंद्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा मालवण भरड नाका येथे मनसैनिकांनी जाळला. मालवण पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदरचा पुतळा मनसैनिकांकडून काढून घेत बाजूला केला. यावेळी मनसैनिकांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मनसे तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, उप तालुकाध्यक्ष पास्कोल रोड्रीक्स, विशाल ओटवणेकर, लौकिक मेथर, रोहन तावडे, साईश कीर, नितीन राठोड, राज शेलटकर, चिन्मय कुणकवळेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# malvan # tarun bharat news# jitendra Aawhad#
Next Article