For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कोई खेले रेल में...कोई खेले जेल में! मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांची उडवली खिल्ली

04:50 PM Mar 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोई खेले रेल में   कोई खेले जेल में  मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांची उडवली खिल्ली

राज्याच्या दारू धोरण घोटाळ्याचा आरोप ठेऊन अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)न अटक केलेल्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी खिल्ली उडवली आहे. या संदर्भातील व्हिडीयो सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून यामध्ये मनोज तिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह होळीचा आनंद घेताना माईकवर कोई खेले रेल में...कोई खेले जेल में असं म्हणत आहेत.

Advertisement

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कडून कथित दारू धोरण घोटाळ्याच्या मार्फत मनी लॉडरिंग च्या केस संदर्भात चौकशी चालु आहे. त्यानंतर 22 तारखेला ईडीने आरोप दाखल करुन अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या या अटकेनंतर आपने देशभरात निदर्शने केली. अनेक राज्यामध्ये आंदोलन छेडून आपने सरकारचा निषेध केला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपने दिल्लीमध्ये अभियान चालवून 'नो होली' पुकारला आहे. त्यामुळे आप कार्यकर्ता यांनी आपल्या नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ होळीचा उत्सव साजरा करणार नाहीत.

Advertisement

दरम्यान, भाजपचे दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी आपला डिवचताना जोरदार होळीचे आयोजन केले आहे. यावेळी कार्यक्रमामध्ये माध्यमांसमोर गीत सादर करताना “कोई खेले रेल में....कोई खेल जेल में,” असे अरविंद केजरीवाल यांना उद्देशून म्हटले आहे. मनोज तिवारी यांच्या या टोल्यामुळे दिल्लीमध्ये राजकिय पारा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.