मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन केली घोषणा
मराठा आंदोलनासाठी मुंबईकडे पदयात्रा काढणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्यादेश काढला. मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्या मान्य करण्याचा आद्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वता मनोज जरांगे- पाटील यांच्या कडे सपुर्द केला. तसेच मराठा समाजाने आपल्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात अत्यंत शांततेने आंदोलन पार पाडले त्याबद्दल मुख्यमंत्री या नात्याने सर्वांचे आभार मानतो असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निकराचा इशारा दिला होता. त्यानंतर आंतरवली सराटीमध्ये राज्य शासनाने मागितलेल्या मुदतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. पण मुदतीनंतरही राज्य शासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलनाला नवी दिशा देत मुंबईकडे कुच केली.
आज मुंबईमध्ये पोहोचण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आध्यादेश काढला तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांनी आज नवी मुंबईतील मेळाव्यात पोहोचून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आद्यादेश त्यांच्या कडे सोपवला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे कि, "मराठा आरक्षणाचे आंदोलन शांततेत पार पडले, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला मराठा समाजाच्या समस्या आणि अडचणी माहित आहेत, यापुर्वी मी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती आज पुर्ण करत आहे. मी जे सांगतो तेच करतो." असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जनसमुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा आध्यादेश काढल्यामुळे मी त्यांचं अभिंनंदन करतो. फक्त मुख्यमंत्र्यांनी या उधळलेल्या गुलालाचा आदर राखावा. यापुढे आम्ही जालन्यातील अंतरवली सारथी गावात आमची पुढची पायरी ठरवण्यासाठी बैठक घेणार आहोत." जरंगे-पाटील म्हणाले.