For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या; ललिता तारख यांची पोलिसांत तक्रार; अश्लील फोटो-व्हिडिओ आणि धमक्यांचा आरोप

10:53 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या  ललिता तारख यांची पोलिसांत तक्रार  अश्लील फोटो व्हिडिओ आणि धमक्यांचा आरोप
Advertisement

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचे समोर आले आहे. आंदोलनात यापूर्वी सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी जरांगे यांच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ, AIच्या माध्यमातून अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून बदनामी केल्याचा तसेच धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

ललिता तारख यांनी सोशल मीडियावर आपल्यावर पैसे घेतल्याचे आणि आंदोलनातून ‘पॅकेज’ मिळाल्याचे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर 2023 पासून आपल्या आणि संबंधित व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“एवढे दिवस मी त्यांच्या बाजूने बोलत होते, त्यामुळे सर्व काही ठीक होते; आता सत्य बोलले तर माझी बदनामी केली जात आहे,” असा दावा तारख यांनी केला. सोशल मीडियावर अश्लील मजकूर आणि फोटो-व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान, तारख यांनी यापूर्वीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांना आश्वासने देण्यात आली, मात्र त्याचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच आंदोलनात महिलांचा भावनिक वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांच्याविरोधात त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांकडून आरोप होत असतानाच त्यांच्या निकटवर्तीयांवरही विविध प्रकरणांत कारवाई झाल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय कटारे यांच्यावरील अवैध वाळू उत्खननाशी संबंधित दंडाची कारवाई पुन्हा लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.