मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण मागे; राज्यव्यापी दौरा सुरु करणार
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. आंतरवली सराटीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी यापुर्वी केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दारात आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर ते मुंबईकडे निघालेही होते मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने ते परत आपल्या गावी आंतरवली सराटीमध्ये परतले.
आजच्या दिवशी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करताना त्यांनी आंदोलन जरी स्थगित केले असले तरी जोपर्यंत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळत नाही तोर्यत आंदोलन सुरुच राहणार असे म्हठले आहे. तसेच काही दिवसात साखळी उपोषणही सुरु करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापुर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतरही आज सागर बंगल्याकडे जातानाही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देताना आपण सागर बंगल्यावर येऊन आंदोलन करणार असे म्हटले आहे. ते म्हणाले, "मराठ्यांना स्वतंत्र असे १० टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने दिलेले स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. त्यामुळे सगेसोयरे या मुद्द्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेचं पालन केलं जावं.अशीही मागणी त्यांनी केली आहे.