“मुंबईत जायला सुरुवात करा”; मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
12:57 PM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू करण्याचे संकेत देत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्यास सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे. “मुंबईत जायला सुरुवात करा,” असे आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केले.
Advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून अपेक्षित निर्णय होत नसल्याने पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी समाजबांधवांना मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले.
दरम्यान, जरांगे यांच्या आवाहनामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisement
Advertisement
Maharashtra newsMaharashtra politicsManoj JarangeManoj Jarange PatilMaratha communityMaratha Movementmaratha reservationMaratha Reservation ProtestMumbai Protest