‘लास्ट मॅन इन टॉवर’मध्ये मनोज
मनोज वाजपेयीला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावंत अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. मनोजच्या पुढील चित्रपटाची घोषणा झाली आहे. अरविंद अडिगा यांच्या ‘लास्ट मॅन इन टॉवर’ नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
बेन रेखीकडून दिग्दर्शित या चित्रपटात बोमन इराणी आणि दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत आहे. या कहाणीला सूनी तारापोरेवाला यांनी मोठ्या पडद्यासाठी रुपांतरित केले आहे. सूनी यांना विविध प्रोजेक्ट्सकरता मीरा नायर यांच्यासोबत केलेल्या कामामुळे ओळखले जाते.
या चित्रपटाची कहाणी एका ‘मास्टरजी’च्या अवतीभवती घुटमळणारी असून ते एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. या शिक्षकाच्या मान्यतांच्या विरोधात समुदायाचे लोक निर्णय घेऊ लागतात, तेव्हा ते एकाकी पडतात. त्यांच्या आसपासच्या लोकांना चांगल्या जीवनाची अपेक्षा दिसू लागते, परंतु मास्टरजी स्वत:च्या तत्वांवर ठाम राहिल्याने त्यांच्या नात्यांची परीक्षा सुरू होते. स्वत:च्या घरांवरून सुरू असलेल्या संघर्षात अडकलेले तसेच स्वत:चे जीवन बदलण्याची संधी मिळाल्यावर कोणत्या अवघड पर्यायांचा सामना करावा लागतो अशा लोकांच्या जीवनाला दर्शविणारी ही कहाणी आहे. या चित्रपटाचे संवाद जूही चतुर्वेदी यांनी लिहिले आहेत. तर संगीत गोविंद वसंत यांनी दिले आहे.