For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महात्मा गांधींच्या भूमिकेत मनोज वाजपेयी

06:36 AM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
महात्मा गांधींच्या भूमिकेत मनोज वाजपेयी
Advertisement

मनोज वाजपेयी एका चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानीच्या जीवनातील एक अशा काळावर प्रकाश पाडणार आहे, ज्याविषयी फारच कमी लोक जाणतात. याची कहाणी गांधींच्या जीवनातील अखेरच्या 21 दिवसांवर आधारित असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा करत असून अनुभव सिन्हा निर्मितीची जबाबदारी पेलत आहे.

Advertisement

या चित्रपटाद्वारे मिश्रा हे दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. अनुभव सिन्हांसोबत मिळून मिश्रा हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील खऱ्या घटनांशी निगडित कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. तर मनोज वाजपेयी पहिल्यांदाच गांधींच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात सौरभ शुक्ला देखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील.

मनोजच्या या चित्रपटाचे नाव ‘गांधी अँड माय मदर’ असेल. कहाणी एका अशा आईची असेल, जी  स्वत:च्या मुलाला गांधींवर चित्रपट तयार करण्यास सांगते. यात एक अभिनेता असून त्याला काही प्रश्न पडलेले आहेत, तर एक आई आहे, जिची स्वत:ची मते आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.