‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये मनोज वाजपेयी
मनोज वाजपेयी पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अभिनेता नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘इन्स्पेक्टर झेंडे’ नावाचा चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटात मनोजसोबत जिम सर्भ देखील दिसून येणार आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. चित्रपटाच्या टीमने यापूर्वीच निर्मितीपूर्व काम सुरू केले आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे मुंबईतच पार पडणार आहे. सर्भ आणि अन्य कलाकार या चित्रिकरणात प्रथम सहभागी होतील तर मनोज वाजपेयी हा स्वत:चे अन्य प्रोजेक्ट्स पूर्ण करत 5 जानेवारी रोजी त्यांच्यासोबत जोडला जाणार आहे.
हा चित्रपट अॅक्शन कॉमेडी धाटणीचा असणार आहे. यातील अन्य कलाकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. तर या चित्रपटाची निर्मिती जय शेवक्रमणिकडून केली जाणार आहे. या बॅनरच्या अंतर्गत यापूर्वी फ्रेडी आणि जाने जां या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.