For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गव्हर्नर’ मध्ये मनोज वाजपेयी

10:51 AM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गव्हर्नर’ मध्ये मनोज वाजपेयी
Advertisement

आरबीआय गव्हर्नरच्या भूमिकेत

Advertisement

मनोज वाजपेयीचा आगामी चित्रपट ‘गव्हर्नर’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाची दोन पोस्टर्स शेअर केली असून यातील एकामध्ये मनोजचा लुक दिसून येतो. चित्रपटाचे नाव ‘गव्हर्नर : द सायलेंट सेवियर’ आहे. विपुल शाह आता या चित्रपटाद्वारे दमदार आणि ग्रिपिंग कहाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.  गव्हर्नरची दोन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली असून यातील एकात सस्पेंसही दिसून येतोय. या पोस्टर्समुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर खूप काही दर्शविते. एका पोस्टरमध्ये मनोज हा कॉरिडॉरमध्ये चालताना दिसून येतो. सूट-बूट परिधान केलेल्या आणि हातात सूटकेस असलेला मनोजचा लुक लक्ष वेधून घेणारा आहे.

चित्रपटाची टॅगलाइन यात असून यावर ‘अगर मैं फेल हुआ....तो इंडिया फेल हो जाएगा’ असे लिहिलेले आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एका हिरव्या खुर्चीला दर्शविण्यात आले असून त्यावर ‘इंडिया दिवालिया होने की कगार पर है’, ‘यह सिर्फ कुर्सी नहीं...जिम्मेदारी है’ अशा टॅगलाइन्स आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर याने केले आहे. ‘गव्हर्नर : द सायलेंट सेवियर’ हा विपुल शाह आणि मनोज वाजपेयीचा पहिला एकत्रित चित्रपट असेल. दोघेही मोठ्या पडद्यावर स्वत:चा करिष्मा दाखविण्यास तयार आहेत. मनोज यापूर्वी ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये दिसून आला होता. तसेच तो पुढील काळात  ‘घूसखोर पंडत’मध्ये दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.