महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मण्णीकेरी श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची उत्साहात सांगता

10:39 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ढोलाच्या गजरात-भंडाऱ्याच्या उधळणीत हजारो भाविकांचा मिरवणुकीत सहभाग

Advertisement

वार्ताहर /कडोली

Advertisement

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या मण्णीकेरी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता बुधवारी मोठ्या उत्साहात झाली. ढोलाच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. गेल्या दि. 14 मे पासून तब्बल 21 वर्षानंतर मण्णीकेरी येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचे आयोजन केले होते दि. 15 रोजी सूर्योदयाला देवीचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर देवीची मिरवणूक दिवसभर चालली होती. त्यानंतर सायंकाळी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न झाली. यात्रा काळात पै-पाहुणे आणि भाविकांचे कोणतेही त्रास होऊ नयेत यासाठी यात्रा कमिटीने सर्व ती तयारी केली होती. यात्रा काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शवून देवीचे दर्शन घेतले. मंगळवार दि. 21 रोजी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांतर्फे देवीची विशेष पूजा आयोजित करण्यात आली. बुधवारी यात्रेच्या सांगता समारंभात सायंकाळी ढोलाच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीत देवीलाही खेळविण्यात आले. मिरवणुकीद्वारे देवीला सीमेकडे नेल्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस खाते, गावातील युवक मंडळे, देवस्थान पंचकमिटी, यात्रा कमिटीने विशेष प्रयत्न केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article