For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मण्णापुरम फायनान्सचे सीईओ दीपक रेड्डींचा रामराम

06:24 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मण्णापुरम फायनान्सचे सीईओ दीपक रेड्डींचा  रामराम
Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

Advertisement

देशातील दुसऱ्या नंबरची मोठी गोल्ड लोन कंपनी मण्णापुरम फायनान्स लिमिटेडचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक रेड्डीं  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिगर बँकिंग क्षेत्रातील सुवर्ण कर्ज देणाऱ्या या कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

वैयक्तिक कारण

Advertisement

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दीपक रेड्डीं यांनी 3 जुलै 2026 रोजी ई-मेलच्या माध्यमातून आपला राजीनामा कंपनीकडे सादर केला आहे. वैयक्तिक कारणाच्या निमित्ताने आपण हा आपला राजीनामा देत असल्याचे त्यांनी ई-मेल मध्ये नमूद केले आहे. असं जरी असलं तरी कंपनीने स्पष्ट केले आहे की दीपक रेड्डीं हे 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील. यानंतरच त्यांना प्रत्यक्षपणे पदावरून कार्यमुक्त केले जाणार आहे.

राजीनामा दिला तरी....

याच दरम्यान त्यांना गार्डन लिववर राहता येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ राजीनाम्यानंतरही त्यांना वेतन आणि इतर लाभांचा फायदा कंपनी देणार आहे. कंपनीच्या नियमित कामकाजामध्ये ते सक्रियपणे सहभाग घेणार नाहीत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपक रे•ाr यांनी आरोग्याच्या कारणास्तव मेडिकल लिव घेण्याची घोषणा केली होती.

आर्थिक स्थिती

मण्णापुरम फायनान्सने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 404 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 191 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता.

Advertisement
Tags :

.