For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला केसरीत भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती

05:56 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला केसरीत भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती
Advertisement
ओटवणे, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 139 व्या भागाचे थेट प्रक्षेपण रविवारी केसरी येथील केएसआर ग्लोबल अॅक्वेरियममध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधानांचे विचार ऐकले.

‘मन की बात’च्या या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेती,  स्थानिक उत्पादनांचा वापर, आरोग्य सुविधांमधील प्रगती आणि देशाच्या इतिहासातील महापुरुषांचे स्मरण अशा विविध विषयांवर भाष्य केले. समाजहित आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाला विजयादशमीच्या दिवशी सुरुवात होऊन 12 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. तसेच पंजाबच्या मालवा भागात रासायनिक पदार्थांचा वापर न करता नैसर्गिक आणि सेंद्रिय कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘खेती विरासत मिशन’च्या ‘नव-त्रिंजन’ उपक्रमाचे कौतुक केले.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकार, कारागीर आणि उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. स्थानिक उत्पादनांचा वापर वाढवून देशातील कारागिरांच्या मेहनतीला योग्य संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

Advertisement

केसरी येथील केएसआर ग्लोबल अॅक्वेरियममध्ये आयोजित या थेट प्रक्षेपणादरम्यान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचे विचार आत्मीयतेने ऐकले. ‘मन की बात’ हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच विविध सामाजिक विषयांवर संवाद साधण्याचे माध्यम ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Tags :

.