महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मनमोहन सिंग 91 व्या वषी राज्यसभेतून निवृत्त

12:17 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1991 पासून 33 वर्षे प्रदीर्घ संसदीय कारकीर्द : 2004 ते 2014 दरम्यान 10 वर्षे पंतप्रधान

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी 3 एप्रिल रोजी राज्यसभेतील आपली 33 वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द संपवली. तत्पूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवार, 2 एप्रिल रोजी डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहून ते यापुढे राज्यसभेवर राहणार नसून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक धाडसी सुधारणा सुरू करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशवासीयांसाठी त्यांचा आवाज बुलंद होत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान सिंग यांच्या आयुष्यात 91 क्रमांकाचे खूप महत्त्व आहे. ऑक्टोबर 1991 मध्ये ते पहिल्यांदा संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. या काळात ते 1991-96 या काळात माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. एवढेच नाही तर वयाच्या 91 व्या वषी 3 एप्रिल 2024 रोजी त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते 2004 ते 2014 दरम्यान 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये देशाची आर्थिक आणि औद्योगिक धोरणे जाहीर करून आर्थिक सुधारणांना सुऊवात केली.

माजी अर्थमंत्री सिंग यांच्या प्रयत्नांमुळे 1991 हे वर्ष भारतासाठी परिवर्तनाचे वर्ष ठरले. त्यांनी आणलेल्या आर्थिक धोरणांच्या मदतीने देशात झपाट्याने बदल होऊ लागले आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली. पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केले तेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या व्यक्तीला अर्थमंत्री बनवून काय साध्य होणार, असे प्रश्न उपस्थित झाले.  या निर्णयावर पक्षात जोरदार टीका झाली. मात्र, त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा करत देशाच्या अर्थव्यवस्थेला नवा आयाम प्राप्त करून दिला. डॉ. सिंग यांना अर्थमंत्री बनवून नरसिंह राव यांनी त्यांना देशाच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल हवा असल्याचे सूचित केले होते. नरसिंह राव यांना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठे बदल हवे होते हेही कालांतराने सिद्ध झाले.

1991 मध्ये पहिले अर्थसंकल्पीय भाषण

24 जुलै 1991 रोजी जेव्हा नेहरू जॅकेट आणि आकाशी निळ्या रंगाची पगडी घातलेले डॉ. मनमोहन सिंग अर्थसंकल्पीय भाषण देण्यासाठी उभे राहिले, तेव्हा संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्यांच्या भाषणात त्या कुटुंबाचा वारंवार उल्लेख होता, ज्यांची धोरणे ते पूर्णपणे नाकारत होते. मात्र, याआधी मनमोहन सिंग यांनी 70 च्या दशकात किमान 7 बजेट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीही, 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पातील एक मोठा भाग स्वत:च्या हातांनी लिहिला. याशिवाय ते स्वत: संसदेत मांडत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article