महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मनीष सिसोदिया, कविता यांना पुन्हा झटका

06:33 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

25 जुलैपर्यंत वाढली न्यायालयीन कोठडी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरी पुन्हा एकदा आप नेते मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांना न्यायालयाकडून झटका बसला आहे. राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 25 जुलैपर्यंत वाढविली आहे. कविता यांची न्यायालयीन कोठडीही आता 25 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीत भाग घेतला होता.

मनीष सिसोदिया आणि कविता यांची न्यायालयीन कोठडी संपुष्टात येणार असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात आता ईडीशी निगडित मुख्य प्रकरणी 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. या घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे.

दिल्लीत नोव्हेंबर 2021 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने एक नवे अबकारी धोरण लागू केले हेते. या अबकारी धोरणाद्वारे काही मद्यविक्रेत्यांना अनुचित लाभ मिळवून देण्यात आल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी जुलै 2022 मध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे तक्रार केली हीत. यानंतर उपराज्यपालांनी अबकारी धोरण घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपविण्याची शिफारस केली होती.

सीबीआयच्या अहवालात कथित स्वरुपात 580 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल हानी झाल्याचे म्हटले गेले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लाभ पोहोचविणे आणि मद्यविक्रेत्यांना मोठा नफा कमाविता येईल अशाप्रकारे हे धोरण तयार करण्यात आले होते असा आरोप आहे.  मद्यविक्रीच्या परवान्याकरता आप नेत्यांनी लाच स्वीकारल्याचाही आरोप आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article