महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनीष सिसोदिया 19 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत

06:19 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आप नेते मनीष सिसोदिया यांना आणखी काही दिवस तुरुंगातच रहावे लागणार आहे. घोटाळ्याशी निगडित सीबीआय प्रकरणी राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने सिसोदियांची न्यायालयीन कोठडी 19 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. यामुळे सिसोदिया यांना तुरुंगातच नववर्ष साजरे करावे लागणार आहे.

न्यायालयाने सीबीआयकडून दाखल आरोपपत्राची दखल घेत सुनावणी केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या वतीने आरोपपत्रातील दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतची मुदत न्यायालयाने दिली आहे. आरोपपत्राशी संबंधित सर्व दस्तऐवज सर्व आरोपींना देण्यात आल्याची माहिती सीबीआयने सुनावणीवेळी दिली होती. आप नेते सिसोदिया यांना फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने अटक केली होती. त्यापूर्वी ते अरविंद केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article