For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनीष कश्यपचा भाजपला रामराम

06:27 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
मनीष कश्यपचा भाजपला रामराम
Advertisement

पाटणा :

Advertisement

बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वीच भाजपला मोठा झटका बसला आहे. बिहारमधील लोकप्रिय युट्युबर मनीष कश्यप यांनी आता भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी भाजपचा सदस्य नसल्याचे मनीष कश्यप यांनी एक्स अकौंटवर एक व्हिडिओ शेअर करत जाहीर केले आहे.

अनेक भागांचा दौरा करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्यावर भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता मला बिहारी आणि मजुरांसाठी लढायचे आहे. याचबरोबर बिहारमधून जे स्थलांतर होतेय, ते रोखायचे आहे. जेव्हा मी भाजपमध्ये होतो, तेव्हा देखील यासंबंधी आवाज उठवत होतो असा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

पक्षात राहून हे मुद्दे जोरदारपणे उपस्थित करू शकणार नसल्याचे वाटत असल्यानेच भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयामुळे अनेक लोक दु:खी होतील, परंतु हा निर्णय घेण्यासाठी मला भाग पाडण्यात आल्याचे सर्वांना माहित असल्याचे मनीष कश्यप यांनी म्हटले आहे.

मनीष कश्यप महत्त्वाकांक्षी असल्याचे अनेक नेते म्हणत होते, परंतु मी असा नव्हतो. मी खरोखरच महत्त्वाकांक्षी असतो, तर 2024 ची लोकसा निवडणूक लढवून भाजपचा खेळ बिघडवू शकलो असतो. परंतु तेव्हा मी या नेत्यांसोबत राहून लोकांना योग्यप्रकारे मदत करू शकेन असे वाटले होते. परंतु सध्या मी स्वत:लाच मदत करु शकत नसल्याची स्थिती आहे. याचमुळे मी भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे मनीष कश्यप यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.