For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्तिककडून मनीष चारीमुंड्या चीत

10:26 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार्तिककडून मनीष चारीमुंड्या चीत
Advertisement

करणकुमार हरियाणा, प्रवीण निलजी, प्रेम कंग्राळी यांचे प्रेक्षणीय विजय

Advertisement

बेळगाव : निलजी येथे ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने अवघ्या सहाव्या मिनिटाला मनीष कुमार हरियाणाला एकलांगी डावावरती चारीमुंड्या चीत करून उपस्थित 25 हजारहून अधिक जणांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी व ऑल इंडिया चॅम्पियन मनीष कुमार हरियाणा भरत पाटील व ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना निलजी यांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला मनीष कुमारने पायाला चाट मारून कार्तिकला खाली घेत घिस्सावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण कार्तिकने खालून डंकी मारत सुटका करून घेतली. तिसऱ्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून मनीष कुमारला खाली घेत पायाला एकलांगी भरली. पण मनीषने बगलडूग काढून त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या मिनिटाला कार्तिकने दुहेरी पट काढून मनीषला खाली घेत एकचाक भरून फिरविण्याचा प्रयत्न केला पण बलदंड शरीराच्या मनीषने रितसर सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून मनीषला खाली घेत एकलांगी भरली. या एकलांगीमधून सुटका करून घेण्यासाठी मनीषने प्रयत्न केला पण शेवटी या डावात खासियत असलेल्या कार्तिकने एकलांगीवर चारीमुंड्या चीत करून उपस्थित शौकिनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक कुमार शिवानंद द•ाr व करण कुमार दिल्ली ही कुस्ती अॅड. रमेश पाटील, अॅड. लक्ष्मण पाटील व श्रीराम ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला शिवानंद द•ाrने एकेरी पट काढून करण कुमारला खाली घेत घिश्शावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून करणने खालून डंकी मारून त्यातून सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला करणने पायाला आकडी लावत शिवानंदला खाली घेतले पण शिवानंदने त्यातून सुटका करून घेतली. दहाव्या मिनिटाला करण कुमारने एकेरी पट काढीत शिवानंद द•ाrला खाली घेत मानेवरचा कस काढून घुटण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिवानंदने सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केले पण करण कुमारने जोरदार घुटना मानेवर ठेवल्याने शेवटी घुटण्यावरती करणने चारीमुंड्या चीत केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे व राम पोटरे शाहुपुरी कोल्हापूर ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली या कुस्तीत दहाव्या मिनिटाला कीर्तीकुमार कार्वेने राम पोटरेला एकचाक मारून चीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोटरेला दमछाक झाल्याने तो मैदान सोडून बाहेर गेला त्यामुळे कीर्तीकुमार कार्वेला विजयी घोषित करण्यात आले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व प्रतिक मेहतर ही कुस्ती जोरदार चालली पण वेळेअभावी ही कुस्ती सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाची कुस्तीत प्रेम कंग्राळीने समर्थ लाटे कोल्हापूरचा झोळे बांधून झोळी डावावरती पराभव केला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पृथ्वी कंग्राळी व अक्षय चौगुले राशिवडे या कुस्ती अक्षय राशिवडेने विजय मिळविला.

Advertisement

सातव्या क्रमांकाची मेंढ्याची कुस्ती प्रवीण निलजीने रुपेश पाटील कोल्हापूरचा आकडी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळवून मेंढ्याचे बक्षीस पटकावले. आठव्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक इंगळगी व सनी राशिवडे ही कुस्ती बरोबरीत राहिली. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत गुत्याप्पा दावणगेरीने ओमकार राशिवडेचा एकलांगी डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत अजित चौगुलेने सारांग राशिवडेचा पायाला एकलांगी बांधून प्रेक्षणीय विजय मिळविला. त्याचबरोबर श्रीकांत शिंदोळीने घुटण्यावर, निरंजन येळ्ळूरने घुटण्यावर, साई मार्केटने घुटण्यावर, विशाल राशिवडेने घुटण्यावर, ओम कंग्राळीने एकचाक डावावर, केशव सांबराने एकलांगी डावावर आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याचप्रमाणे नितीन मुतगा, करण खादरवाडी, निशांत राशिवडे, तेजस लोहार राशिवडे, सिद्धार्थ तीर्थकुंडे राशिवडे, प्रल्हाद मुचंडी, केशव मुतगा, केशव सांबरा, राम निलजी, रोहन कडोली, ऋतिक सुतार, हर्ष कंग्राळी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवरती नेत्रदीपक विजय मिळविला. मानाच्या गदेच्या पहिल्या कुस्तीत जगन्नाथ पाहुणे कराडने ओमकार पाटील चंदगडचा घिस्सा डावावर, दुसऱ्या गदेच्या कुस्तीत युवराज मोजे पुणेने सौरभ पाटील कोल्हापूरचा बॅकथ्रो डावावरती तर तिसऱ्या गदेच्या कुस्ती ऋषीकेश सुतार कोल्हापूरने रोहन पाटील बागलकोटचा निकाली डावावरती पराभव करून गदेचे मानकरी ठरले. आखाड्याचे पंच म्हणून नवीनकुमार मुतगे, भावकाण्णा पाटील मुतगा, सुधीर बिर्जे, बाबू कल्लेहोळ, गंगाराम बाळेकुंद्री, अर्जुन मुकुंद, छायाप्पा मोदगेकर, कृष्णा अष्टेकर, गोपाळ पाटील, मारुती पाटील, शंकर मोदगेकर, शंकर पाटील आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले राशिवडे यांनी केले. तर सर्व कुस्ती शौकिनांना येळगूडचे ओमकार चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यासह हलगीच्या तालावर कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.

Advertisement
Tags :

.