For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपाल हेल्थचा आयपीओ 29ला होणार लाँच

06:35 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मणिपाल हेल्थचा आयपीओ 29ला होणार लाँच
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस यांचा आयपीओ या आठवड्यात 29 तारखेला खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 9275 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने आयपीओची इश्यू किंमत 560 ते 590 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. यामध्ये 8 हजार कोटी रुपयांचे 13.56 कोटी नवे समभाग सादर केले जातील. याच प्रमाणे  1275.22 कोटी रुपयांचे 2.16 कोटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत.

या ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक कंपन्या इम्पेरिअस हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंट आणि मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप ऑफ इंडिया समभागांची विक्री करणार आहेत. गुंतवणूकदार टीपीजी एसजी मॅगझिन, सेवंटी सेपेंड इन्व्हेस्टमेंट कंपनी, नोव्हो होल्डिंग्ज इन्व्हेस्ट एशिया आणि फोनिक्स बिअर इन्व्हेस्टमेंट हेदेखील समभाग विक्री करू शकतात, असे म्हटले जात आहे.

Advertisement

देशात 49 हॉस्पिटल्स

मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस ही देशभरामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, क्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्रे चालवते. मणिपाल हेल्थ यांची 31 मार्च 2026 पर्यंत 49 हॉस्पिटल्स आणि 21 क्लिनिक्स देशभरामध्ये सुरु आहेत. कंपनीने 560 ते 590 रुपये प्रति समभाग अशी इश्यू किंमत निश्चित केली असून एका लॉटमध्ये 25 समभाग असणार आहेत.

31 जुलैला आयपीओ होणार बंद

अँकर गुंतवणुकदारांना 28 जुलै रोजी बोली लावता येणार आहे. 31 जुलै रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे. कंपनीचा समभाग एनएसई व बीएसईवर 5 ऑगस्ट रोजी सूचीबद्ध होऊ शकतो. कंपनी या आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर कर्ज फेडण्यासाठी त्याचप्रमाणे हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी व इतर कारणांसाठी करणार आहे.

Advertisement
Tags :

.