कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपाल हेल्थचा पुढील वर्षी येणार आयपीओ

07:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : भारतातील हॉस्पिटल साखळी चालवणारी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसचा लवकरच आयपीओ सादर होणार आहे. 1 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारणी करण्याचा कंपनीचा मानस आहे. यायोगे कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 12 ते 15 अब्ज डॉलर्सवर पोहचणार आहे.  सदरचा कंपनीचा आयपीओ हा पुढील वर्षी मध्यावर सादर केला जाऊ शकतो. मणिपाल हेल्थ आयपीओकरीता आपली कागदपत्रे पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारीत सेबीकडे सादर करेल, असे सांगितले जात आहे. यानंतर तीन ते चार महिन्यात अर्जाला मंजुरी मिळू शकते. यानंतर कंपनी आयपीओ सादर करण्याची जाहीर करु शकते. याआयपीओ सादरीकरणानंतर कंपनीचा बाजार भांडवल मूल्य 12 ते 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचू शकते, असे म्हटले जात आहे. कंपनीने आपला विस्तारही अलीकडे केलेला आहे. महाराष्ट्रात सह्याद्री हॉस्पिटलसोबत करार कंपनीने केला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article