For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनिका पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनिका पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

जेधा : येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या ग्रँडस्मॅश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेटेपटू मनिका बात्राने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. सदर इलाईट विश्व टेटे स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी बात्रा ही भारताची पहिली महिला टेटेपटू आहे. या स्पर्धेत मनिका बात्राने दुसऱ्या फेरीतील सामन्यात द्वितीय मानांकित वेंग मेन यू चा पराभव केला होता. सौदी अरेबियातील या स्पर्धेत मनिका बात्रा ही सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असून बुधवारी झालेल्या सामन्यात तिने जर्मनीच्या 14 व्या मानांकित निना मिटेलहॅमचा 11-6, 11-9, 11-7 अशा गेम्समध्ये केवळ 22 मिनिटात पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. आतापर्यंत बात्रा आणि मिटेलहॅम यांच्यात चारवेळा सामने झाले असून बात्राचा हा मिटेलहॅमवरचा पहिला विजय आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.