For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनिका बात्रा विजयी, श्रीजा अकुला पराभूत

06:14 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनिका बात्रा विजयी  श्रीजा अकुला पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/मकाऊ

Advertisement

भारताच्या टेबल टेनिस स्टार मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी मंगळवारी मकाऊ येथे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (आयटीटीएफ) विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या दिवशी भिन्न कामगिरी केली. मनिकाने विजय मिळविला तर श्रीजा पराभूत झाली.

महिलांच्या स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत 47 व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने अमेरिकेच्या 42 व्या क्रमांकावर असलेल्या लिली झांगचा 3-2 (11-7, 11-2, 14-16, 5-11, 11-6) असा पराभव केला. मनिकाचे सामन्यावर पूर्ण वर्चस्व होते आणि ती सरळ गेममध्येच सामना जिंकेल असे वाटत होते. परंतु लिलीने जोरदार पुनरागमन करत तिसऱ्या गेममध्ये टायब्रेक घडवून आणला आणि त्यानंतर चौथ्या गेम जिंकून सामना निर्णायक पाचव्या गेममध्ये नेला.

Advertisement

तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या बात्राचा अनुभव दबावाखाली कामी आला. कारण तिने स्पर्धेतील आपला शेवटचा गट फेरीचा सामना जिंकला. दरम्यान, जागतिक क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर असलेल्या अकुलाने पोर्तुगालच्या फू यू विरुद्ध पहिला गेम जिंकून चांगली सुरूवात केली, पण जागतिक क्रमवारीत 48 व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंविरुद्ध ती 1-3 (8-11, 11-9, 15-13, 11-8) ने पराभूत झाली.

श्रीजाचा गट फेरीतील अंतिम सामना बुधवारी चीनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या गांग मान्यू विरुद्ध होईल. पुरूष एकेरीतील आपला पहिला सामना दक्षिण कोरियाच्या पार्क गँगह्योनकडून हरलेला मानव ठक्कर, बुधवारी स्वीडनच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ट्रल्स मोरेगार्डविरुद्ध खेळेल. आयटीटीएफ विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने पदक जिंकलेले नाही. मनिका आणि श्रीजा यांनी 2025 च्या स्पर्धेतही भाग घेतला होता. पण त्या गट फेरीच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत.

Advertisement

.