For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबाप्रेमींना केशर आंब्याची प्रतीक्षा

11:17 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंबाप्रेमींना केशर आंब्याची प्रतीक्षा
Advertisement

बाजारात आंब्याला बहर : हापूसचे दर आवाक्याबाहेर

Advertisement

बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचे दर अद्याप चढेच आहेत. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या केशर आंब्याची प्रतीक्षा सर्वसामान्य ग्राहकांना लागली आहे. बाजारात म्हणावा तसा केशर आंबा दाखल झाला नाही. येत्या काही दिवसांत हा आंबा दाखल होईल, असा अंदाजही विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. आंब्याच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. बाजारात आंब्याची आवक वाढू लागली आहे. कोकणातील हापूस बरोबर स्थानिक कर्नाटकचा आंबाही दाखल होऊ लागला आहे. मात्र, हापूस आंब्याचा दर सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे नागरिकांना केशर आणि स्थानिक आंब्याची प्रतीक्षा लागली आहे. स्थानिक आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानंतर हापूस आंब्याचे दर देखील खाली येणार आहेत. यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज बागायत खात्याने वर्तवला आहे. उष्ण हवामान आंबा उत्पादनास पूरक आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात आंबा उत्पादन वाढणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या पेट्या दाखल होऊ लागल्या आहेत. मात्र, या आंब्याचा दर 500 ते 700 रुपये डझन इतका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चव चाखणे अशक्य होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य आंब्याचे दर कमी होतील, अशा अपेक्षेत आहेत.

ग्राहकांनी सावध राहण्याची गरज

Advertisement

अलीकडे आंबा कृत्रिमरित्या लवकर पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर वाढू लागला आहे. मात्र असे आंबे आरोग्यासाठी बाधक आहेत. गतवर्षी रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे विकण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे. त्याबरोबर हापूसच्या पेटीत स्थानिक आंबे घालून विकण्यात येत आहेत. ग्राहकांची यामध्ये लुबाडणूक होत असते. बाहेर बॉक्स हापूस आंब्याचा आणि आतमध्ये आंबे मात्र स्थानिक असे प्रकारही दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खबरदारी घेऊन खरेदी करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.