शहरात 8 मेपासून आंबा प्रदर्शन
बेळगाव : दर्जेदार आंबे थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार दि. 8 मे ते रविवार दि. 10 मे या कालावधीत आंबा प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दररोज सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात शास्त्रीय पद्धतीने काढणी केलेले व नैसर्गिकरित्या पिकविलेले आंबे थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताजे, गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित फळे थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून तर आमदार आसिफ सेठ अध्यक्षस्थानी असणार आहेत. या आंबा प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन बागायत खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.