महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंबा-काजू पीक विम्याची रक्कम खाती जमा होण्यास प्रारंभ

09:54 AM Nov 11, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शेतकऱ्यांनी मानले वैभव नाईक, सतीश सावंत यांचे आभार

Advertisement

कणकवली | प्रतिनिधी
आंबा व काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने आपला हिस्सा विमा कंपनीकडे जमा न केल्याने यावर्षी रक्कम शेतकऱ्यांना जमा होण्यास विलंब लागला. आमच्या सातत्याच्या पाठपुरावा व आंदोलनामुळेच ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Advertisement

आज आपल्यामुळे रक्कम जमा झाल्याचा दावा करणारे वर्षभर कुठे होते? विम्याची रक्कम कुणामुळे रखडली हे जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदारांना माहित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी शिवसेनेमुळेच गोड होणार आहे. जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु आहे. पुढील दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे, त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना आंबा व काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी कणकवली विजय भवन येथे आ.वैभव नाईक व सतीश सावंत यांच्यासमवेत बैठक घेऊन नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा करण्याची ग्वाही दिली होती. तसे पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आनंदित झाले असल्याचे श्री. नाईक व श्री. सावंत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
# vaibhav naik # satish sawant# sindhudurg# tarun bharat news#crop insurance amount
Next Article