For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महावितरणच्या माणगाव उपकेंद्रावर माणगाव ग्रामपचायतीची जप्तीची कारवाई

08:08 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
महावितरणच्या माणगाव उपकेंद्रावर माणगाव ग्रामपचायतीची जप्तीची कारवाई
Advertisement

महावितरण वर अशाप्रकारच्या जप्तीचा राज्यातील पहिलाच प्रसंग सुमारे 16 लाख 14 हजार 401 इतका थकीत कर

रुकडी प्रतिनिधी

माणगाव ग्रामपंचायतीने येथील महावितरणच्या माणगाव उपकेंद्रा कडील थकीत असलेल्या उपकेंद्राच्या रुपये 16,14,401/- इतक्या ( सोळा लाख चौदा हजार चारशे एक ) थकीत करापोटी जप्तीची धडक कारवाई केल्याने महावितरणचे धाबे दणाणले असून विज थकीत बिलासाठी कनेक्शन तोडणारयांचीच फ्यूज काढून माणगाव ग्रामपंचायतीने जोराचा धक्का दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे महावितरणवर अशा प्रकारची . राज्यातील पहिलिच कारवाई असल्याने महावितरण प्रशासनाला शॉक बसला आहे.

Advertisement

महावितरणच्या माणगाव उपकेद्राने सन 2015 - 2016 साला पासून ग्रामपंचायतीचा कर भरला नाही यासाठी कंपनीच्या माणगाव येथील कार्यालयास ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदी नुसार पहिल्यांदा 2 सप्टेंबर 2023 रोजी 129(1) ची पहिली वसुली नोटीस दिली त्या नोटीस ची मुदत संपले नंतर ही 129 (2) नोटीस दिली त्याची मुदत संपल्यानंतर ही त्यांनी उपकेंद्राचा थकीत कर भरला नसलेने त्यांना सात दिवसापूर्वी अंतिम जप्ती आदेश बजावण्यात आला होता. त्यानंतर ही त्यांनी उपकेंद्राच्या थकीत कर भरला नसलेने दिनांक 1 मार्च 2024 रोजी महवितरन कंपनीचे माणगाव येथील उपकेंद्रावर रीतसर ग्रामपंचायतीच्या मासिक सभे मध्ये जप्ती अंमलदार म्हणून ग्रामसेवक बी.बी.राठोड यांची नियुक्ती करत थकीत करापोटी जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये उपकेंद्रात असणारे लाकडी टेबल 2 , लोखंडी टेबल 1 , लोखंडी बाकडे 1 , लाकडी खुर्ची 1 , प्लास्टिक खुर्ची 1 , कुशन खुर्ची 2 , आदी साहित्य जप्त करण्यात आले.
आज झालेल्या जप्ती कारवाई मधे सरपंच राजू सरपंच , उपसरपंच विद्या जोग , जप्ती अंमलदार व ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड , गावकामगार तलाठी सोमनाथ शिंदे , पोलीस पाटील करसिद्ध जोग सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

माणगाव येथील महावितरणच्या कार्यालयावर 10:30 वाजता जपतीसाठी येणार असल्याची रीतसर नोटीस ग्रामपंचायती कडून बजावण्यात आली होती . मात्र येथील सहायक अभियंता उमेश कदम हे तब्बल 2 तास उशिरा म्हणजेच 12 नंतर कार्यालयात आल्याने त्यांना आपल्या कामा बद्दल गांभीर्य नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थातून येत होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.