For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मांगल्य’ शॉपिंग मॉलचे टिळकवाडी येथे थाटात उद्घाटन

12:55 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मांगल्य’ शॉपिंग मॉलचे टिळकवाडी येथे थाटात उद्घाटन
Advertisement

कन्नड अभिनेत्री श्रीलीला यांची उपस्थिती : कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाचे कपडे हे ‘मांगल्य’ शॉपिंग मॉलचे वैशिष्ट्या

Advertisement

बेळगाव : ‘मांगल्य’ या अनगोळ क्रॉस येथे नव्याने सुरू झालेल्या शॉपिंग मॉलचे उद्घाटन कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला यांच्या हस्ते सोमवार दि. 2 रोजी चाहत्यांच्या लक्षणीय गर्दीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभय पाटील उपस्थित होते. तेलंगणाच्या वारंगल येथे 2012 मध्ये पी. एन. मूर्ती यांनी  ‘मांगल्य’ शॉपिंग मॉलची सुरुवात केली. आंध्रप्रदेशनंतर ‘मांगल्य’ने कर्नाटकमध्ये प्रवेश केला असून बेळगावमधील हे 27 वे  शॉपिंग मॉल आहे. पॅन इंडियामध्ये हा मॉल प्रथम क्रमांकावर आहे. या शॉपिंग मॉलचे उद्घाटन केल्यानंतर श्रीलीला म्हणाल्या, बेळगावचे लोक या मांगल्य शॉपिंग मॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.

त्यांच्या सदिच्छा आणि सहकार्यामुळे हा मॉल यशाची कीर्ती शिखरे पादाक्रांत करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दीपप्रज्वलन करून  मॉलचे उद्घाटन केल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी मांगल्य शॉपिंग मॉल बेळगावात सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन या मॉलमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून स्थानिक बाजारपेठेमध्ये मांगल्याची भर पडल्याचे सांगितले. बाजारपेठेच्या बदलत्या ट्रेंडप्रमाणे आमच्या स्वत:च्या हँडलुम्समध्ये आम्ही पोशाख किंवा वस्त्रप्रावरणांचे डिझाईन करतो. वस्त्रप्रावरणांच्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये आम्ही सतत अग्रेसर असतो. उत्तम दर्जा, माफक दर आणि सर्व घटकांतील लोकांसाठी एकाच छताखाली करता येण्याजोगी खरेदी हे आमचे वैशिष्ट्या आहे. 99 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंतचे कपडे येथे उपलब्ध आहेत.

Advertisement

लवकरच तीन राज्यांमध्ये किमान दहा  शॉपिंग मॉल सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे चेअरमन कासम नम:शिवाय यांनी सांगितले. यावेळी संचालक कुलुरू नरसिंहमूर्ती, कासम मल्लिकार्जुन, कासम केदारीनाथ, कासम शिवप्रसाद व पुल्लुरू अरुणकुमार हेही उपस्थित होते. या मॉलमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती, मुले यांच्यासाठी वस्त्रप्रावरणांचे अनेक नमुने आहेत. शिवाय लग्नसराईच्या बस्त्यांसाठी वेगळे दालन आहे. कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाचे कपडे हे आमचे वैशिष्ट्या असून बेळगावकरांनी लाभ घेण्याचे आवाहन मॉलच्या संचालकांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.