रस्त्याचा ठेका मंजूर ; पण रस्ताच नाही
मणेरीवासिय हक्काच्या रस्त्यासाठी छेडणार उपोषण ; सरपंचांना निवेदन
दोडामार्ग – प्रतिनिधी
मणेरी तळेवाडीला जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप ठेकेदाराने न केल्यामुळे उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गावचे सरपंच सिद्धी कांबळे यांना निवेदन देत दिला आहे. मणेरी गावातील कुमायकडून तळेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरकरणाचे काम मंजूर असून सदर रस्त्याचे काम ठेकेदाराने घेतलेतेही आहे. मात्र आज पर्यंत प्रत्यक्ष कामालाही ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आलेली नाही. आम्ही गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी याची कल्पना आपल्याला दिलेली आहे. आम्हा गावातील लोकांना त्या रस्त्याने ये जा करत असताना धूळखात रस्ता शोधत जावं लागत कारण त्या ठिकाणी पूर्वी पासून जो रस्ता मंजूर केला तो रस्ता जाग्यावर दिसत नाही. त्या जमीन मालकाने त्या ठिकाणची माती काढून पूर्वी जुना रस्ता होत्याचा न होता केलेला आहे. त्यामुळे आम्हा गावातील लोकांना त्याठिकाणहून ये जा करताना धूळखात रस्ता शोधावा लागतो. तरी याची आपण दखल घेऊन ठेकेदाराला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला सांगावे. नाविलाज म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ सोमवार दि. 24 मार्च पासून त्याच रस्त्यावर उपोषण छेडणार असल्याचे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.यावेळी संजय नाईक, कृष्णा (तातू) गवस ,अरुण नाईक,सुधीर बोर्डेकर,अभिजीत नाईक,आत्माराम नाईक,विकास गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.