For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळ जाहीर झाला; आता पंचनामे करून मदत द्या, मंद्रूपच्या शेतकऱ्यांची मागणी

05:43 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळ जाहीर झाला  आता पंचनामे करून मदत द्या  मंद्रूपच्या शेतकऱ्यांची मागणी
Advertisement

मंद्रूप, प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे : खरीप हंगामात पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयाचे मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत करून आभार मानले आहेत. मात्र, दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनानेही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली असून पंचनामे आणि मदत वितरणाची प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

“दुष्काळ जाहीर झाल्याने दिलासा मिळाला आहे. आता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत लवकर त्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे,” अशी भावना मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.