For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांद्रेत राजकीय हालचालींना वेग; मगो पक्षाला मोठा धक्का, आमदार जीत आरोलकर भाजपच्या वाटेवर

09:38 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मांद्रेत राजकीय हालचालींना वेग  मगो पक्षाला मोठा धक्का  आमदार जीत आरोलकर भाजपच्या वाटेवर
Advertisement

मांद्रे: मांद्रे मतदारसंघाच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Advertisement

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जीत आरोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत मानसिक तयारी केली असून, यासंदर्भातील हालचाली अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जीत आरोलकर हे मांद्रे मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून मगो पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मांद्रे मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, आरोलकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे तसेच भाजपकडून होणाऱ्या संभाव्य घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

.