For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन

04:44 PM Apr 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत  चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन
Chandradeep Narke
Advertisement

सांगरूळ :

कोल्हापूर जिल्हयातील पायाभूत विकासासाठी खासदार मंडलिकांनी वेळोवेळी संसदेत प्रश्न मांडून विकासकामांचा पाठपूरावा करण्याबरोबरच मोठया प्रमाणावर निधीही उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावली.गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाच्या अनेक योजना राबविल्या.यामुळे संजय मंडलिक यांना करवीरची जनता पुन्हा एकदा निवडून देईल असा विश्वास माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. महायुतीचे शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित संपर्क द्रौयावेळी सांगरूळ , ता. करवीर येथे ते बोलत होते.

Advertisement

यावेळी नरके म्हणाले, काँग्रेसने साठ वर्षाच्या सत्तेच्या काळात घोटाळयांची अन भष्ट्राचाराची मालिकाच निर्माण केली.खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघातील रस्ते, सामाजिक सभागृह, तालीम इमारत यासाठी कोटयावधीचा निधी दिला. पी.एम. किसान योजनेद्वारे देशभरातील शेतक्रयांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर रेशनच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जात आहे. त्यामूळे विकासाची दुरदृष्टी असण्राया नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी करवीरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.

यावेळी भाजपचे मुख्य समन्वयक हंबीरराव पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मधूकर जांभळे, दत्तात्रय मेडशिंगे, नामदेव पाटील, कुंभी कारखाना संचालक राहुल खाडे, दादासो लाड, माजी संचालक सदाशिव खाडे ,निवास वातकार, बाजीनाथ खाडे, कुंभी बँक संचालक प्रदीप नाळे, भरत पाटील,संभाजी नाळे,आनंदा कसोटे,ज्योत्स्ना पाटील, राजाराम खाडे,अर्जुना खाडे, शिवाजी देसाई, सदाशिव बाटे, उपस्थित होते. प्रचार दौऱ्यात खाटांगळे येथे संताजी पाटील, कुंडलिक पाटील बहिरेश्वर येथे तानाजी गोधडे, युवराज दिंडे,बाळासो बचाटे,रंगराव कामत ,शिवाजी चव्हाण, कुंभी बँक संचालक कृष्णात वरुटे, विलास चौगले,महादेव चौगले, बाजीराव चौगले, आनंदा पाटील, इत्यादीसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.