महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानव ठक्कर, श्रीजा अकुला विजेते

06:31 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ विजयवाडा

Advertisement

येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूष विभागात टॉप सिडेड मानव ठक्कर तर महिला विभागात श्रीजा अकुला यांनी अजिंक्यपदे पटकाविली. ठक्करने अंतिम सामन्यात दुखापतग्रस्त जी. साथियानचा तर महिलांच्या विभागात श्रीजाने अर्चना कामतचा पराभव केला.

Advertisement

पुरूष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड मानव ठक्करने द्वितीय मानांकित जी. साथियानचा 4-2 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. या अंतिम लढतीत सुरूवातीला साथियानने मानव ठक्करवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर साथियानला पाठ दुखापतीच्या समस्येमुळे दर्जेदार खेळ करता आला नाही आणि मानव ठक्करने या संधीचा फायदा घेत त्याच पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात मानव ठक्करने अँथोनी अमलराजचा 4-1 तर द्वितीय मानांकित जी. साथियानने सौरभ सहाचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

महिलांच्या विभागातील एकेरीच्या अंतिम सामन्यात श्रीजा अकुलाने अर्चना कामतचा 3-1 असा फडशा पाडत एकतर्फी अजिंक्यपद पटकाविले. उपांत्य लढतीत श्रीजाने चौथ्या मानांकित सुतिर्थचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर अर्चना कामतने अनुशा कुटुंबळेचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.

19 वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या विभागातील जेतेपद उत्तरप्रदेशच्या सार्थ मिश्राने पटकाविले. अंतिम सामन्यात सार्थने उत्तरप्रदेशच्या दिव्यनेश श्रीवास्तवचा 4-3 असा पराभव केला. सार्थने उपांत्य फेरीच्या सामन्यात जेस मोदीचा 3-1 तर दिव्यनेशने कर्नाटकाच्या के. जे. आकाशचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. मुलींच्या 19 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्रच्या प्रिता वर्टीकरने आपल्याच राज्याच्या संपदा भिवंडीकरचा 4-1 असा पराभव करत अजिंक्यपद मिळविले.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article