For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मण्णापुरम फायनान्सचा समभाग 6 टक्के तेजीत

06:14 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मण्णापुरम फायनान्सचा समभाग 6 टक्के तेजीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

मण्णापुरम फायनान्सचा समभाग बुधवारी शेअरबाजारात तेजी राखताना दिसला आहे. कंपनीचा समभाग बुधवारी बीएसईवर 6.4 टक्के इतका वाढत 269 रुपयांवर पोहचला आहे. इंट्रा डे दरम्यान समभागाने उच्चांकी गाठली होती. यातुलनेत बीएसई सेन्सेक्स 2.32 टक्के इतका वाढत 75788 अंकांवर व्यवहार करत होता. बेन कॅपिटल यांनी मण्णापुरममध्ये 26 टक्के हिस्सेदारी खरेदीचा निर्णय घेतल्याच्या बातमीचा परिणाम समभागावर बुधवारी पाहायला मिळाला. खुली ऑफरअंतर्गत हा व्यवहार होणार असून रिझर्व्ह बँकेने याला मंजुरी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.