महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आनंदनगर वडगाव नाल्यावरील अतिक्रमणावर हातोडा

10:55 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नाला सफाईला अडचण ठरत असल्याने मनपाची बुलडोजर कारवाई 

Advertisement

बेळगाव : आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली आहे. नाल्यावर अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वीच सूचना केली होती. मात्र,याची दखल घेतली नसल्याने मनपाकडून रविवारी कारवाई करून अतिक्रमण हटविले.नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याने पावसाळ्यामध्ये नाले सफाई करताना अडचण निर्माण होत आहेत. तर नाल्यांमध्ये कचरा साचून पावसात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनपाकडून नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर काही जणांनी अतिक्रमण केले होते. मनपाच्या जागेवर सदर नागरिकांकडून अतिक्रमण केल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना केली होती. मात्र नागरिकांकडून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे.नाला सफाईला अडचण ठरत असल्याने मनपाकडून रविवारी धडक कारवाई करून केलेले अतिक्रमण हटविले. येथील पाच पत्र्याचे शेड हटवून त्यांना जवळच असणाऱ्या जागेत पुनर्वसन केले आहे, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Advertisement

अतिक्रमण झाल्याने नाले सफाईला अडथळा

मनपा जागेवर अतिक्रमण केल्याने संबंधित नागरिकांना यापूर्वीच अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना केली होती. नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नाले सफाईला अडथळा निर्माण झाला होता.यासाठी सदर नागरिकांचे शेड हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

- लक्ष्मी निपाणीकर (मनपा अधिकारी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article