Navratri 2025 Ambabai Temple: योग्य नियोजन, सुविधांमुळे अंबाबाईचे दर्शन भाविकांसाठी सुलभ
गेल्या तीन दिवसात तीन लाखांवर भाविकांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आहे
कोल्हापूर : यावर्षी प्रथमच पोलीस आणि देवास्थन समीतीने भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी विविध बदल केले. याचा उपयोग भाविकांना दर्शन आणि वाहन पार्किंग साठी होत आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेतील गर्दी व रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायदा होत आहे.
यावर्षी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, गेल्या तीन दिवसात तीन लाखांवर भाविकांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आहे. मात्र हे दर्शन घेत असताना. दर्शन रांग कोठेही रेंगाळताली नाही. याचे कारण देवस्थानकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी करण्यात आलेल्या उपाय योजना. यात प्रथमच दर्शन गतीने होण्यासाठी साक्षी गणेश मंदिराजवळील पायऱ्याची उंची कमी केल्यामुळे तेथे जाणारा वेळ वाचला.
त्यानंतर आत महाकाली चौकात असणारा तीन फुटांचा दर्शन मार्ग लाकडी रॅम्प ने वाढवण्यात आला. मंदीरातील जो दगडी खडतर मार्ग होता. त्याठिकाणी लाकडी फ्लोरिग केल्यानेही रांगेला गती आली. तर पितळी हुबऱ्याची पायरी उची कमी केली आहे.
पाच वेळच्या आरतीसाठी दिवसातील अडीच तास दर्शन रांग बंद राहिल्याने रांग रेंगाळत होती. मात्र आता आरतीच्या वेळेस ही पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शन चालू असल्याने तो वेळ कमी झाला. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना दुकान लाईन समोर बाहेर पडता येत होते.
आता बाहेर पडण्यासाठी सरस्वती चौकातून डावीकडे शनिमंदिरा जवळ बारा फुटांचा लाकडी रॅम्प केल्याने बाहेर येण्याची गती वाढली आहे. यासर्व बदलामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा वेळ कमी झाला असल्याने कीतीही गर्दी असली तरी अवघ्या एक ते सव्वा तासात भाविक दर्शन घेऊन बाहेर येत आहेत.
देवास्थनने दर्शन रांगेतील भाविकांना जास्त वेळ थांबावे लागू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. भाविकांना रांगेत असताना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पिण्याच्या पाण्याची रांगेत व्यवस्थ करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक पोलिसांकडून ही पार्किंगची पुरेशी व्यवस्था करण्यात आली असल्याने गेल्या तीन दिवसांत शहरात कुठेही वाहतूक कोडीं झाली नसल्याचे चित्र आहे. या पार्किंगच्या ठिकाणी 64 मोबाईल टॉयलेटची भाविकांसाठी सुविधा करण्यात आली आहे. सध्या स्थनिक स्वरांज्य संस्थच्या निवडणुका असल्याने प्रवासी वाहने मोठ्या संख्येने शहरात येत आहेत.
मात्र ठिकठिकाणी पार्किंगची सोय असल्याने वाहतुकीची केंडी फारशी जाणवत नाही. बाहेरील आरामबसमधून महिलांचा सहभाग मोठा दिसत आहे. एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळे महाद्वार रोडवर एक वेगळेच विलोभनीय चित्र पाहावयास मिळत आहे.
गेल्या दोन दिवसात अडीच लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. देवस्थानने दर्शनाचे योग्य नियोजन केल्याने अवघ्या तासाभरात देवीचे दर्शन होत आहे. त्याच बरोबर पोलीस प्रशासनानेही वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन योग्य आणि पुरेशा प्रमाणात केल्याने शहरात कुठेही वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत नाही.
एकूणच चालू नवरात्रमध्ये गेल्या तीन दिवसात देवास्थनचे दर्शनाचे, पोलिसांचे वाहतूक व पार्किंगचे व महानगर पालिकेचे स्वच्छतेचे योग्य नियोजन असल्याने शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन होत आहे. पोलिसांसह स्वयंसेवी संस्था व पोलिसमित्र गर्दीच्या नियोजनात सक्रिय आहेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेकडून मंदिर परिसराची दोन वेळा स्वच्छता होत आहे.
यासाठी महापालिकेने पथक तयार केले आहेत. या पथकांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच रात्री मंदिर परिसर आणि रस्ते महापालिके कडून स्वच्छ करण्यात येत असल्याने कचरा साचत नाही. एकूणच चालू नवरात्रीमध्ये प्रशासनाने विविध पातळीवर घेतलेली दक्षता आणि केलेल्या योग्य नियोजनामुळे भाविकांचे दर्शन सुलभ झाले आहे.