महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीराम चरित्रातील व्यवस्थापन दर्शन

06:56 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भगवान श्रीरामचंद्रांचे जीवन म्हणजे जीवनाच्या अनेकविध मार्गदर्शक तत्व आणि तत्वज्ञानाचा एक अनोखा संगमच म्हणायला हवा. श्रीराम चरित्राचा थोड्या वेगळ्या अर्थाने व आगळ्या संदर्भात अभ्यास केल्यास, त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला व्यवस्थापकीय जीवन संदर्भ आणि त्या अनुषंगाने आजही प्रचलित आणि लागू असणाऱ्या व्यवस्थापकीय तत्व आणि व्यवस्थापनविषयक तत्वज्ञानाचे दर्शन आवश्य घडते.

Advertisement

 

Advertisement

श्री राम चरित्रातील अनेकविध प्रसंग आणि त्यासंदर्भात त्यांची भूमिका, जीवनविषयक दृष्टिकोन व मुख्य म्हणजे त्यांनी केलेले आचरण, व्यवहार इ. सर्वांचे उत्साहवर्धक करणारे, दूरदर्शी व कूटनितिज्ञ, विनयशील, संवेदनशील, सदाचारी, मित्र व सहकाऱ्यांचे हितेशी, मैत्रीपूर्ण व्यवहार, सत्याची पाठराखण करणारे व त्याचवेळी संकटसमयी उचित निर्णय घेऊन त्या निर्णयांचे संपूर्ण परिणाम आणि जबाबदारीसह पालन करणारे इत्यादींची प्रकर्षाने जाणीव करून देते. व्यवस्थापन क्षेत्रात व व्यवस्थापकीय संदर्भात ही मूल्ये आजही महत्त्वपूर्ण ठरत असून त्याचाच हा एक गोषवारा.

मूलत: श्रीराम एक सच्चे मित्र व सहकारी होते. आपल्या सहकारी मित्रांसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावण्याचीदेखील त्यांची तयारी असायची. आपले सहकारी व मित्रांमधील गुणांना अचूकपणे हेरुन, त्यांची पारख करून त्यांनी आपल्याभोवती मित्र-मैत्री व परस्पर विश्वासाचे अद्भूत जाळे निर्माण केले होते. ज्येष्ठ सखा हनुमानाशिवाय वानरराज सुग्रीव व विभिषणासारखे सहकारी मित्र यासंदर्भातील उत्तम उदाहरणे ठरतात.

रामचरित मानसमध्ये नमूद केल्यानुसार

धीरज, धरमू, मित्र अरु नारी।

आपतीकाल परखिलाडू चारी।।

म्हणजेच धैर्य, धर्म, मित्र आणि स्त्री या चौघांची परिक्षा आपत्काली म्हणजेच संकटसमयी खऱ्या अर्थाने होते. कठिण प्रसंगी यापैकी जे खऱ्या अर्थाने साथ देतात. त्यातच त्यांचे खरेपण दडलेले असते. याचसंदर्भात सुग्रीवाला आपल्या मैत्रीचा हवाला देतांना ते म्हणतात-

सखा सोच त्यागहू बल मोरे।

सब विधी घटब काज में तोरे।।

म्हणजेच हे सख्या सुग्रीवा, तू तुझी सारी काळजी आता माझ्यावर सोपव. मी हर प्रकारे तुझ्या कामी येईन व सर्व प्रकारे तुझी मदत करीन. आपल्या सहकाऱ्यांप्रती अशा प्रकारची कल्पना, भावना आणि त्यानुरुप व्यवहार कामाच्या ठिकाणी एकजिनसीपणा-एकजिवपणा निर्माण करण्यास साह्याभूत होत असतो.

‘योग्य व्यक्ती-योग्य ठिकाणी’ हे सध्या एक सर्वमान्य व यशस्वी असे व्यवस्थापन तंत्र ठरले आहे. विशेषत: मानव विकास व्यवस्थापनाच्या संदर्भात या उक्तीची योग्यता सर्वमान्य ठरली असून यासंदर्भातही आपल्याला अत्यंत प्रेरक असे वचन जे बालकांडात नमूद केलेले आढळते ते

पुढीलप्रमाणे

सुनि सनमानहि सबहि सुबानी।

भविति भगति नति गति पहिचानी।।

यह प्राकृत महिपाल सुभारु।

जान्ह शिरोमनि कोसलराऊ।।

म्हणजेच सर्वांचे मुद्दे ऐकून, म्हणणे ऐकून त्यांचे बोलणे, त्यातील अर्थ, विनयशीलता व पद्धती यावरून सर्वांचा यथायोग्य सन्मान करण्याची, त्यांची यथोचित दखल घेण्याची श्रीरामशैली म्हणजे संन्यासी, राजाचे मूर्तिमंत लक्षण असून ते आजही आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरते.

याच संदर्भात पुढे सुंदरकांडात नमूद केलेली एक बाब छोटीशी असली तरी फार महत्त्वाची व प्रत्येक व्यवस्थापकावर दूरगामी स्वरुपात परिणामकारक ठरते.

अस कपि एक न सेना माही।

राम कुशल जेहि पूंछी नाही।।

याचाच अर्थ असा की सुग्रीवसेनेतील वानर सैनिक ज्यावेळी सीतामातेच्या शोधार्थ जात त्यावेळी त्यापैकी प्रत्येक वानर सैनिकाशी संभाषण साधून प्रभू रामचंद्र त्यांचे क्षेम कुशल आवश्य विचारीत.

याच आधारे व्यवस्थापकांनीही विशिष्ट काम आणि कामगिरी करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांशी उच्च-नीच, भेदभाव न करता प्रामाणिकपणे व मोकळेपणाने त्यांची विचारपुस केल्यास अनेक बाबी सहज शक्य होऊ शकतात ही एक व्यवस्थापकीय वस्तुस्थिती आहे. हनुमानाच्या माध्यमातून सुग्रीवाची भेट झाल्यावर त्याला किष्किंधाचा राजा बनविण्याचे वचन श्रीराम याप्रमाणे देतात.

जो कछु कहेरु सत्य सब होई।

सखा वचन यम मृबा न होई।।

म्हणजेच हे सुग्रीवा, माझे वचन वाया जात नाही. मी वालीला केवळ एकाच बाणाने मारेन व तुला किष्किंधाचे राज्य आणि राजेपण बहाल करीन. आपले हे वचन त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केले. तर विभिषणाला लंकेचे राज्य देणाऱ्या श्रीरामांनी युद्धादरम्यान रावणाने विभिषणावर चालविलेली दैवी शक्ती स्वत:च्या छातीवर झेलून व अक्षरश: स्वत:च्या प्राणांची बाजी लावून त्याचे रक्षण केले व आपले.

एवमस्तु कहि प्रभु सघीरा।

मांग तुरत सिंधु कर नीरा।।

जदपि सखा तव इच्छा नाही।

अस कहि राम तिलक तेहि सारा।।

हे वचन पूर्ण केले.

आपला शब्द, आपले वचन पूर्ण करणे हे व्यवस्थापकांचेसुद्धा आद्य व मुलभूत कर्तव्यच ठरते. असे केल्याने त्यांना व त्यांच्या पदाला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त होते व हाच रामकथेचा मुख्य भावार्थ आहे.

काम करताना अनेकविध प्रकारच्या अडचणी येत असतात. ठरल्याप्रमाणे-नियोजितपणे सारी कामे होतातच असे नाही. प्रसंगी काही अडचणीही निर्माण होतात व त्यावर मात करण्यासाठी आवश्यकता असते ती येणाऱ्या, अपेक्षित, अनपेक्षित संकटांवर मात करण्याची व त्यानुसार अशा संकट प्रबंधनाची. श्रीराम चरित्रात या संदर्भातील  काही दाखले मोठ्या चपखलपणे आढळून येतात.

ज्यावेळी श्रीरामचंद्र अयोध्या सोडून वनात जाण्यासाठी सिद्ध होतात. त्यावेळी गुरु वशिष्ठांकडे जाऊन ते त्यांना अशी विशेष विनवणी करतात की, हे गुरुवर, तुम्ही माझ्या अयोध्यावासियांचे माता-पित्यासमान रक्षण करावे.

अयोध्याकांडात याचेच वर्णन

दासी दास बोलाइ बहोरी।

गुरहि सौंपि बोले कर जोरी।।

सब के सार संभार गोसाई।

करबि जन जननी की नाई।।

अशा शब्दात आढळते.

येणाऱ्या संकटांचा वेळेत व समर्पक मागोवा घेऊन आपल्या सहकारी सहोदरांचे रक्षण करीत असतानाच संकटांवर मात करण्याची, सर्वांगीण नियोजन-कुशलता व्यवस्थापकांच्या अंगी असावी लागते. त्यादृष्टीने पाहता श्रीरामजीवन आणि चरित्र हे यशोगाथेचे एक उत्तम उदाहरण असून त्यामध्ये अनेक ठिकाणी इतरेजनांना त्यांच्या कामाचे श्रेय देऊन प्रसंगी त्यांचे आभार मानणारी उदाहरणेसुद्धा आढळून येतात ती पुढीलप्रमाणे.

‘राज काज सब लाच पति धरति धन लाभ।

गुरु प्रभारु प्रलिहि सबहि भल होईहि परिनाम।।

अयोध्याकांडातच नमूद केल्यानुसार राजकाम, प्रतिष्ठा, धर्माचरण, भूमी, धन, महाल इ. गुरुप्रभावातूनच प्राप्त होतात व त्यांचा एक विशेष चांगला असा प्रभाव असतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

(पूर्वार्ध)

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article