महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीराम चरित्रातील व्यवस्थापन दर्शन

06:30 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

(उत्तरार्ध)

Advertisement

श्रीराम व हनुमानाच्या परस्पर स्नेहाचे रोचक वर्णन लंकाकांडात आहे.

Advertisement

हरषि राम भेटेऊ हनुमाना।

अति कृतम्य  प्रभु सुजाना।।

म्हणजेच प्रसन्नतेने श्रीराम हनुमानाला भेटले, ते हनुमानाप्रती फार कृतज्ञ होते  अशा शब्दात केले आहे. यावरून श्रीरामांची आपले सहकारी-जीवाभावाचे काम करणाऱ्यांप्रती असणारी कृतज्ञता स्पष्ट होते. व्यवस्थापकीय संदर्भातसुद्धा यश हे सामूहिक व सर्व समावेशक असते व तसे असणे अपेक्षित असते. जे व्यवस्थापक आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्य आणि योगदानाचे कौतुक करतात. त्यांच्या विशेष कामाची नोंद घेतात व त्यांच्या यशाला अधिक यश व व्यापकता लाभत जाते. व्यवस्थापक जर संवेदनशील व भावनाप्रधान असेल तर त्याचे कामकाज अधिक प्रभावी बनते. श्रीरामचरित्रात तर ही बाब अनेक प्रसंगांद्वारा जाणवते. प्रभू रामचंद्र म्हणजे विनम्रता आणि अहंकारमुक्त आचरणाचे मूर्तिमंत उदाहरण होय. बालकांडात नमूद केल्यानुसार

जेहिं विधि होइ सुखी सब लोगा।

करहिं कृपानिधि सोइ संजोगा।।

याचाच अर्थ असा की ज्या वागण्या-बोलण्याने सर्व लोक सुखी होतील. अशाच प्रकारच्या वागण्या-बोलण्याचा अंगीकार कृपानिधी राम करतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे उच्च तंत्रज्ञान-तत्वज्ञान असेल, मात्र विनयशीलता नसेल तर मोठे व्यावसायिक-व्यवस्थापकसुद्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाहीत, हे याठिकाणी उल्लेखनीय आहे. श्रीरामचंद्रांच्या इतरेजनांना उत्साहित प्रोत्साहित करण्याच्या या प्रवृत्तीचे प्रत्यंतर  साक्षात वानरसेनेच्या संदर्भात सुद्धा आले होते ते असे.

कृपादृष्टि कपि भालु विलोके।

मुद्रा प्रबल रन रहें न रोके।।(लंकाकांड)

याचाच अर्थ असा की श्रीरामांनी आपल्या कृपादृष्टीसह वानरांकडे पाहिले व त्यांच्या अशा पाहण्यानेच वानरसेना बलिष्ट झाली व अतूट युद्धासाठी तुटून पडली. व्यवस्थापक-व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रोत्साहित सहकारी काय करू शकतात याचे हे एक मूर्तिमंत उदाहरण असून प्रगत व्यवस्थापनशास्त्रात पण ते मोठ्या चपखलपणे बसते. त्याचप्रमाणे प्रत्येक सामूहिक कृतीत सर्वांच्या विचाराने-सल्याने काम करणे म्हणजेच यशाची पूर्व तयारी समजली जाते. अनेकांच्या महत्त्वपूर्ण अनुभवकथन, सल्याने यशाचा पाया मजबूत होत असतो. व्यावसायिक वा व्यवस्थापनपर क्षेत्राशी निगिडित अशी ही महत्त्वपूर्ण बाब आपल्याला अरण्यकांडात दिसते ती पुढीलप्रमाणे

अब सो मंत्र देहु प्रभु मोही।

जेहि प्रकार मारों मुनिद्रोही।।

त्यामुळेच अभेद्य समजल्या जाणाऱ्या लंकेवर स्वारी करण्यापूर्वी आपल्या मंत्र्यांशी संवाद करताना श्रीरामांनी सांगितले,

लंका बांके चारि दुआरा।

केहि विधि  लागिअ करहु बिचारा।।

याचाच अर्थ असा की या लंकेला चार अति बिकट दरवाजे आहेत, हे लक्षात घेता लंकेवर हल्ला कशा प्रकारे यशस्वी होईल याचा तुम्ही विचार करा. जे व्यवस्थापक आपल्या सहकाऱ्यांच्या अनुभव कथनांचा लाभ घेतात ते हमखास  यशस्वी होतात. आपले धोरण ठरविताना श्रीराम चरित्रातून आपल्याला कूटनिती-व्यवस्थापकीय धोरणांचे दर्शन होते. आपले वेळोवेळीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांनी देश, काळ, वातावरण व वेळेचे अचूक ध्यान ठेवलेले आढळते. निर्णयप्रक्रियेच्या संदर्भात या चार महत्त्वपूर्ण सूत्रांचा वेळेनुसार अवलंब केल्यानेच यशाने त्यांची कायमस्वरुपी साथ दिली. आपल्या उपलब्ध सहकाऱ्यांमध्ये कोण, कुठल्याप्रसंगी व निर्णायक काम करेल याचा पडताळा घेऊन त्यांच्यावर त्यानुरुप काम सोपविणे ही व्यवस्थापकांची मोठी कसोटी असते. उदाहरणार्थ लंकाकांडात श्रीरामांनी म्हटले होते की, माझ्या बुद्धीनुसार असा सल्ला देतो की, बालीपुत्र अंगदाला दूत म्हणून पाठवा. या ठिकाणी अंगदाच्या दृढ इच्छाशक्तीला चतुरतेची असणारी व्यावहारिक  जोड त्यांनी नेमकेपणे हेरली होती. ही आणि अशी कूटबुद्धीवर आधारित नितीच आपल्याला वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक जीवनातदेखील यशस्वी करते. याच संदर्भातील पुढील प्रसंग आणि दृष्टांत अनेकार्थांनी प्रेरणादायी ठरतो. श्रीरामेश्वरम येथे लक्ष्मणाला मूर्च्छा आली असता श्रीरामचंद्रांसह सर्वजण हतबल होतात. पुढे काय? या चिंतेने सारी रामसेना ग्रासलेली असते. अशा निर्णायक अवस्थेत रामायणात एरवी विशेष प्रकाशात न आलेले एक पात्र म्हणजेच जांबुवंत पुढे येते. जांबुवंत, तू सुद्धा स्वत:ची शक्ती आणि अचाट क्षमतेला विसरावेस? या, साऱ्या रामसेनेत केवळ तू आणि तूच द्रोणागिरी व त्यावरील वनौषधींच्या शोधाद्वारे लक्ष्मणाला वाचवून श्रीरामकार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेऊ शकतोस, याचा तुला कसा विसर पडला? जांबुवंतांच्या या प्रेरणास्पद व प्रोत्साहनपर संभाषणाने हनुमानाला त्याच्या विशालकाय स्वरुप आणि ताकतीचे स्मरण होते आणि त्यातून रामायणाला वेगळी दिशा देण्याचे महत्कार्य जांबुवंतांच्या हातून घडते. इतरेजनांना त्यांचा वकूब, क्षमता, ताकद इत्यादींसह प्रेरित-प्रोत्साहित करून कामाला लावण्यावर व्यवस्थापकांचा भर असायला हवा, याची प्रेरणाच या प्रसंगातून मिळते व मुख्य म्हणजे प्रसंगी तुलनेने कमी चर्चेत असणारे कनिष्ठ व एरवी फारसा गाजावाजा न करणारेही फार मोठे काम करू शकतात, याचा कृतिशील वस्तुपाठही रामचरित्र व रामायणातून मिळतो. व्यवस्थापकीय संदर्भात त्याचे महत्त्व आणि महात्म्य आजही कायम असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article