For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्त कारावास; सोलापूर न्यायालयाचा मोठा निकाल

04:21 PM Apr 19, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्त कारावास  सोलापूर न्यायालयाचा मोठा निकाल
Advertisement

                        सोलापुरात पोक्सो प्रकरणात न्यायालयाचा कडक निर्णय

Advertisement

सोलापूर -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी २० वर्षे सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील पीडित आणि आरोपी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. ते मोबाईल फोनवरून संवाद साधत असत. ८ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास आरोपी राजकुमार याने पीडितेला अंबाबाई मंदिराच्या जवळ बोलावले आणि त्यानंतर तिला मोटारसायकलवरून आपल्या घरी नेले. त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. आरोपी राजकुमार याने तिच्याशी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले.

Advertisement

त्यानंतर, त्याने तिला तिच्या घरी सोडले. पुन्हा ११ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास पीडितेला अंबाबाई मंदिराच्या जवळ बोलावले आणि मामाच्या शेतात नेले आणि तिथेही त्याने तिच्यावर संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केला. ३१ डिसेंबर २०२० रोजी पीडिता आणि तिच्या आईमध्ये घरकामावरून भांडण झाले. पीडितेने आरोपी राजकुमार यासयाबद्दल माहिती दिली. १ जानेवारी २०२१ रोजी आरोपी राजकुमार याने पीडितेला पुन्हा अंबाबाई मंदिराजवळ बोलावले आणि त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात, मग साईबाबा मंदिरात आणि पुढे कर्नाटक राज्यातील आगरखेड येथील एका गावात नेले. ही सर्व घडलेली घटना पीडितेने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी विजापूर चनाका पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून ल पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजकुमार यास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. गायकवाड करून यांनी गुन्ह्याचा तपास न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वतीने बचावासाठी २ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राहय धरून आरोपीस २० वर्षांचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.या खटल्यात सरकारच्यावतीने अॅड. कविता बागल, अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे अॅड. ए. एन. शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून एस. एस. घाडगे यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.