लेब्रुन बंधूंकडून मानुष-मानव पराभूत
वृत्तसंस्था/ चेन्नई
सिंगापूरमध्ये शुक्रवारी झालेल्या डब्ल्यूटीटी ग्रँड पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर यांचा पाच गेमच्या थरारक पराभवानंतर डब्लूटीटी ग्रॅड स्मॅश टेटे स्पर्धेत भारताची पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा सुरुच आहे.
सहाव्या मानांकित भारतीय जोडीला प्रेंच बंधू व चौथ्या मानांकित अॅलेक्सिस आणि फेलिक्स लेब्रुन यांच्याकडून 36 मिनिटांत 2-3 (6-11, 11-7, 10-12, 11-9, 8-11) असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या गेममध्ये मानुष आणि मानव लेब्रुन्सविरुद्ध एकही गेम पॉईट रुपांतरित करु शकले नाहीत. तरीही, फ्रेंच जोडीविरुद्ध भारतीयांची ही कामगिरी त्यांच्या मागील एकमेव लढतीच्या तुलनेत खूपच चांगली होती. डब्लूटीटी ग्रँड स्मॅश स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय जोडी बनली. 2023 मध्ये, लेब्रुन्सने लांझोऊ येथे झालेल्या डब्लूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये मानव-मानुषवर 3-1 असा विजय मिळवला होता.