For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांचा कारावास

12:44 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांचा कारावास
Advertisement

जिल्हा पोक्सो न्यायालयाचा निकाल

Advertisement

बेळगाव : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला. देवराज अशोक मेत्री (वय 28) रा. हुनशाळ ता. मुडलगी असे त्याचे नाव असून मंगळवार दि. 3 रोजी जिल्हा पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे. पीडित मुलीवर आरोपी दोन वर्षांपासून प्रेम करत होता. मुलगी सुटी घेऊन घरी आली होती. त्यावेळी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या घरच्यांनी पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास हाती घेऊन बेपत्ता मुलीचा शोध घेतला.

तिने सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी आरोपीने मोटारसायकलवरून तिचे पलायन केल्याचे स्पष्ट झाले. अपहरण केल्यानंतर एका नवीन घरात आरोपीने तिच्यावर दोन-तीनवेळा लैंगिक अत्याचार केला. लग्नाच्या आमिषाने 14 सप्टेंबर 2023 रोजी बेळगावला दोघेजण आले. बसस्थानक आवारात मोटारसायकल पार्क करून रेल्वेतून बेंगळूरला गेले. तेथे राहणे अशक्य झाल्याने ते पुन्हा रेल्वेतून हुबळीला आले. पुन्हा तेथून 16 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वेच्या माध्यमातून बेंगळूरला गेले. त्यामुळे याप्रकरणी कुलगोड पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Advertisement

त्याच्या विरोधात तत्कालीन तपास अधिकारी श्रीशैल बॅकूड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी जिल्हा पोक्सो न्यायालयात सुरू होती. त्या ठिकाणी 9 साक्षी, 14 कागदोपत्री पुरावे, 13 मुद्देमाल तपासण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास व 10 हजाराचा दंड ठोठावला. पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकारकडून 4 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचा आदेशही बजावला आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.