For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमरावती आणि वर्ध्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा मृत्यू; उपचारादरम्यान सोडला प्राण

10:05 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमरावती आणि वर्ध्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा मृत्यू  उपचारादरम्यान सोडला प्राण
Advertisement

अमरावती: अमरावती व वर्धा जिल्ह्यात मिळून चार जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिरजगाव कसबा परिसरातून वनविभागाच्या पथकाने सोमवारी (दि. ०७) मोठ्या कसरतीनंतर ट्रॅक्युलायझर गनद्वारे डार्ट मारून या वाघिणीला बेशुद्ध करत जेरबंद केले होते. मात्र, दीर्घ प्रवासाचा ताण आणि डार्टमुळे झालेल्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीने दोन्ही जिल्ह्यांत प्रचंड दहशत निर्माण केली होती. तिने सर्वप्रथम १७ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील राजाभाऊ भोयर यांची उपचारादरम्यान प्राण सोडले मोर्शी तालुक्यात शिकार केली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील २७ ऑगस्ट रोजी चरणदास इखे या शेतकऱ्याला, रविवारी सोनोरी येथील उर्मिला इवने या तरुणीला आणि सोमवारी जेरबंद होण्यापूर्वी शिरजगाव कसब्यातील दिनेश आवारे या शेतकऱ्याला ठार केले.

सलग चार बळी घेतल्याने या भागात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण होते. वाघिणीच्या वाढत्या उपद्रवामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष घालून पुण्याहून तज्ज्ञांचे पथक पाचारण केले होते. पुणे आणि अमरावती वनविभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत दुपारी ३ वाजता तिला जेरबंद केले. तिला उपचारासाठी व पुढील देखरेखीसाठी नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात येणार होते. मात्र, बेशुद्ध करण्यासाठी मारलेल्या डार्टमुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि वैद्यकीय तपासणीदरम्यान तिचा मृत्यू झाला, असे विभागीय वन अधिकारी कमलेश पाटील यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.