सासऱ्याच्या खूनप्रकरणी जावयास अटक
इचलकरंजी :
पत्नीला नांदायला पाठवण्यावरून झालेल्या वादातून सास्रयाचा दगडाने ठेचून खून करण्राया जावयाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराड येथे अटक केली. सिकंदर मोहमदअली शेख (वय 32, रा. षटकोन चौक, इचलकरंजी) असे संशयिताचे नाव असून, मृत सास्रयाचे नाव जावेद बाबु लाटकर (वय 41, तीनबत्ती चार रस्ता, आझाद गल्ली) आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री आझाद गल्लीत ही दुर्दैवी घटना घडली.
सिकंदर शेख याचा जावेद लाटकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. मात्र सततच्या कौटुंबिक वादांमुळे ती माहेरी राहत होती. याच कारणावरून शेख नेहमी सासरच्या लोकांशी वाद घालत होता. बुधवारी रात्री दुचाकीवरून आझाद गल्लीत आलेल्या शेखने लाटकर यांच्याशी वाद घालून त्यांना घरापासून काही अंतरावर ओढत नेले. साथीदारांना हत्यार काढा, असे म्हणत मोठमोठ्याने ओरडत त्याने लाटकर यांना जमिनीवर पाडले व त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगडाने जबर मारहाण केली. प्रचंड रक्तस्त्रावामुळे लाटकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा ऐकून गर्दी केली. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून शेख आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.
वरिष्ठ पोलीस अधिक्रायांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या. या पथकाने कराड येथे शोधमोहीम राबवत सिकंदर शेखला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, संजय कुंभार, प्रशांत कांबळे, नवनाथ कदम, महेश पाटील, सागर चौगले, यशवंत कुंभार आणि विनायक बाबर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.