For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्याला अटक

11:23 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्याला अटक
Advertisement

साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

बेळगाव : अॅमेझॉनसह विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या कंपनीच्या एका पूर्वाश्रमी कामगाराला अटक करून त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवार दि. 6 रोजी माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली असून शुभम शशिकांत दिंडे (वय 29) रा. शिवाजीनगर, दुसरा मेन असे आरोपीचे नाव आहे. अॅमेझॉन कंपनीच्या अधिकृत वितरक असलेल्या प्रवीण पद्मराज तडसद रा. जमखंडी जि. बागलकोट यांनी 4 जानेवारी 2026 रोजी माळमारुती पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दिली होती.

14 जून ते 2 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान ऑटोनगर येथील अॅमेझॉन आणि विविध कंपन्यांचे इलेक्ट्रीक साहित्य चोरी झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत कंपनीचा पूर्वाश्रमीचा कर्मचारी शुभम दिंडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 18 स्मार्ट फोन, एक टॅब, पाच स्मार्ट वॉच, एक गिंबल, स्टॅबिलायजर आणि एअरपॅड, हेडफोन असा एकूण सुमारे 4 लाख 49 हजार 321 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक व्हनाप्पा तलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.