For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : बार्शीत बेकायदा पिस्टल, काडतुसे घेऊन फिरणाऱ्यास अटक

07:11 PM Feb 06, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   बार्शीत बेकायदा पिस्टल  काडतुसे घेऊन फिरणाऱ्यास अटक
Advertisement

                                      सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement

सोलापुर : सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शी येथे बेकायदा पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विपुल शिवाजी यादव (वय २९, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचेनाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने बार्शीतील वाणी प्लॉट येथून संशयित विपुल यादव यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली.

Advertisement

त्यावेळी विपुल यादव याच्या पॅन्टीत खवलेले १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्यामुळे याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर अधिक्षक प्रितम यावलकर, पो.नि. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कुलदीप सोनटक्के, प्रकाश कारटकर, हवालदार सलीम बागवान, विरेश कलशेटटी, धनराज गायकवाड, प्रमोद शिंपाळे, अन्वर अत्तार, योगेश जाधव यांनी केली.

Advertisement
Tags :

.