For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममता कुलकर्णीची किन्नर आखाडयातून हकालपट्टी

05:40 PM Jan 31, 2025 IST | Pooja Marathe
ममता कुलकर्णीची किन्नर आखाडयातून हकालपट्टी
Advertisement

महामंडेश्वर पद घेतलं काढून
प्रयागराज
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनी भारतात परतली आणि कुंभ मेळाव्यात संन्यास घेत महामंडलेश्वर बनली. पण किन्नर आखाड्यातील वादांमुळे ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी झाली.
२५ वर्षानंतर भारतात येताच ममताने कुंभमेळाव्याला हजेरी लावली. दरम्यान तिला महामंडलेश्वर पद देण्यात आले. यानंतर किन्नर आखाड्यात वाद सुरू झाले. आणि पद बहाल केल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसात ममता कुलकर्णीची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तिच्याकडून महामंडलेश्वर ही उपाधी काढून घेण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे.
याशिवाय किन्नर आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर हे पद लक्ष्मी नारायण यांच्याकडूनही काढून घेण्यात आले. या दोघींनाही किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली.
ममता कुलकर्णी यांनी काहीच दिवसांपूर्वी कुंभमेळाव्यात संन्यासाची दिक्षा घेतली होती. दरम्यान त्यांना महामंडलेश्वर पदही देण्यात आले. या निर्णयावर आखाड्यातील संतांनी विरोध केला. याशिवाय आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण यांच्यावर कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनविल्याप्रकरणी कारवाई सुद्धा होऊ शकते.

Advertisement

Advertisement
Tags :

.