For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मामूटीच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा

06:08 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
मामूटीच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा
Advertisement

दिग्दर्शक खालिद रहमानसोबत करणार काम

Advertisement

मल्याळी सुपरटार मामूटी आता फिल्ममेकर खालिद रहमानसोबत एका नव्या चित्रपटात काम करणार आहेत. अलिकडेच मामूटी यांनी याची माहिती दिली आहे. आगामी चित्रपट क्यूब्स एंटरटेनमेंट्स बॅनरच्या अंतर्गत निर्माण केला जाणार आहे.

खालिद रहमान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मामूटी आणि खालिद रहमान हे यापूर्वी 2019 साली ‘उंडा’ चित्रपटासाठी एकत्र आले होते. त्या चित्रपटातही मामूटी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यात ईश्वरी राव, रंजीत, शाइन टॉम चाको, अर्जुन अशोकन आणि जॅकब ग्रेगरी हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. मामूटी यापूर्वी ‘कलमकवल’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Advertisement

मामूटी हे अभिनेते असण्यासोबत निर्माते देखील आहेत. त्यांनी मल्याळी चित्रपटांसोबत तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नडसमवेत अन्य भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 74 वर्षीय अभिनेत्याने 400 हून अधिक चित्रपटामंध्ये काम केले आहे. मामूटी यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले असून यात तीन राष्ट्रीय चित्रपट पुस्कार आणि पद्मश्री सामील आहे.

Advertisement
Tags :

.