ममदानी हे ‘मूर्ख कम्युनिस्ट’
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लक्ष्य
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाचे उमेदवार अन् भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममदानी हे 100 टक्के मूर्ख कम्युनिस्ट आहेत असे म्हणत ट्रम्प यानी ममदानी यांना समर्थन देणाऱ्या अन्य नेत्यांवरही टीका केली आहे. 100 टक्के मूर्ख कम्युनिस्ट जोहरान ममदानी यांनी आताच डेमोक्रेटिक प्रायमरीत विजय मिळविला असून ते महापौर होण्याच्या मार्गावर आहेत. ममदानी अत्यंत खराब दिसतात, त्यांचा आवाज कर्कश आहे,ममदानी यांचे समर्थन करणारे सर्वजण मूर्ख आहेत, आमचे महान पॅलेस्टिनी सिनेटर क्रायन चक शूमर त्यांच्यासमोर झुकत आहेत. हा देशाच्या इतिहासातील महान क्षण आहे असे उपरोधिक वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
जोहरान ममदानी कोण?
जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे मुस्लीम आहेत. भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे युगांडातील मार्क्सवादी स्कॉलर महमूद ममदानी यांचे ते पुत्र आहेत. ममदानी यांनी निवडणुकीत विजय मिळविल्यास ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम महापौर ठरणार आहेत. ममदानी यांना डेमोक्रेटिक सोशलिस्ट्स अणि अमेरिका पार्टीचे समर्थन मिळाले आहे. ते पॅलेस्टिनींचे उघड समर्थन करतात, तर इस्रायलवर नरसंहाराचा आरोप त्यांनी केला आहे.