For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला झटका देण्याची ममतादीदींची तयारी

06:32 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपला झटका देण्याची ममतादीदींची तयारी
Advertisement

भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या राजकारणात मंगळवारी एक नवे वळण दिसून आले. राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप खासदाराची भेट घेण्यासाठी त्याच्या निवासस्थानी धाव घेतली. भाजपचे राज्यसभा खासदार अनंत राय महाराज यांनी ममता बॅनर्जी यांनी निवासस्थानी स्वागत केले. दोघांच्या भेटीविषयी अधिक माहिती समोर आली नसली तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

अनंत राय महाराज हे उत्तर बंगालच्या राजकारणातील मोठे चेहरे आहेत. याच भागात भाजपने मागील काही वर्षांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण केला आहे. अनंत राय महाराज हे उत्तर बंगालच्या कूचबिहारला पृथक ग्रेहर कूच बिहार राज्य करण्याची मागणी करणारी संघटना ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. स्वत:ला ग्रेटर कूचबिहारचे महाराज संबोधिणारे अनंत यांना भाजपने मागील वर्षी पश्चिम बंगालमधूनच राज्यसभेवर पाठविले होते. अनंत हे पश्चिम बंगालमधून भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर पोहोचणारे पहिले नेते देखील आहेत.

आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनंत यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती आणि यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने पुढे काय घडणार अशी चर्चा होत आहे. नरेंद्र मोदींच्या मागील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले निशिथ प्रामाणिक हे अनंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. प्रामाणिक देखील अनंत यांच्याप्रमाणेच राजवंशी समुदायाचे सदस्य आहेत.

राजवंशी समुदाय प्रभावी

पश्चिम बंगालच्या अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येत सुमारे 18 टक्क्यांहून अधिक भागीदारी राजवंशी समुदायाची आहे. राजवंशी समुदाय अनुसूचित जातीमधील सर्वात मोठा आणि प्रभावशाली समुदाय आहे. राजकीयदृष्ट्या उत्तर बंगालच्या 5 जिल्ह्यांमधील 20 विधानसभा मतदारसंघांमध्ये राजवंशी समुदायाचे मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. या 5 जिल्ह्यांमध्ये कूचबिहारसोबत अलीपूरद्वार देखील सामील आहे, येथे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली होती, परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कूचबिहार मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

Advertisement
Tags :

.